‘तिरंगा यात्रा’ : विद्वेषी सत्ताकारणाविरोधात ऐक्याचा बुलंद पुकारा...
गेल्या काही वर्षांत धर्माच्या आधारे अनैसर्गिक विषमतेचे समर्थन करून भारताच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता यांवर आधारित लोकशाहीवर संविधानविरोधी शक्ती प्रहार करताना दिसत आहेत. म्हणूनच आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल, तर समतेवर आधारित, भेदभावरहित, प्रेम, करुणा, सहिष्णुता अशा मूल्यांना जपणारा समाज निर्माण करावा लागेल. त्यासाठी स्वातंत्र्याचा जागर अविरतपणे करावा लागेल.......